भूकंप पूर्वसूचना तंत्रज्ञान Earthquake Alert System

 

भूकंपाची पूर्वसूचना देणारे “भूकंप पूर्वसूचना तंत्रज्ञान Earthquake Alert System !!”
जगभरात दररोज भूकंप होतात, लाखो लोक भूकंपप्रवण प्रदेशात राहतात. जय भुकंम्पाची पूर्वसूचना मिळाली तर अनेक प्रकारचे नुकसान टाळू शकतो.

भूकंपाचे शास्त्र

जेव्हा पृथ्वीचे दोन तुकडे अचानक एकमेकांवरून सरकतात तेव्हा भूकंप होतो. ज्या पृष्ठभागावर ते घसरतात त्याला फॉल्ट किंवा फॉल्ट प्लेन म्हणतात.
बहुतेक भूकंप पृथ्वीच्या कवचात होतात. आपल्या पृथ्वीच्या भूकवचाच्या वर खडकांचा पाच ते तीस मैल खोल थर जो आहे , त्याला खडकांतील भेगा, किंवा खडकातील दोष असे म्हणतात, हा एक प्रकारचा फॉल्टमध्ये, ज्याला स्ट्राइक-स्लिप फॉल्ट म्हणतात, फॉल्टच्या एका बाजूचे खडक दुसऱ्या बाजूच्या खडकांच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे ऊर्जा तयार होते.

 

वर्षानुवर्षे, हि घर्षण प्रक्रिया चालू राहते . पण शेवटी, हि प्रक्रिया खूप ताणली जाते. तेव्हा ताणलेल्या रबर बँडप्रमाणे, खडक अचानक एकमेकांच्या मागे सरकतात किंवा आपटतात . ज्या ठिकाणी हे घडते त्या जागेला भूकंपाचे केंद्र असे म्हणतात.

 

उदा .सॅन अँड्रियास फॉल्ट ही उत्तर अमेरिका आणि पॅसिफिक भूभागाच्या प्लेट्समधील सीमारेषा आहे. हा फॉल्ट दक्षिण कॅलिफोर्नियामधून सॅन फ्रान्सिस्कोच्या अगदी उत्तरेकडे सातशे मैलांवर आहे.  तेथून  प्रशांत महासागराच्या म्हणजेच पॅसिफिक महासागराचा भाग आहे . हा फॉल्ट  वाळवंटी भाग, शेतजमिनी  यामध्ये पसरलेला आहे . या भूभागावर  लोकवस्ती आहे.

 

भूकंप पूर्वसूचना तंत्रज्ञान Earthquake Alert System

भारतातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि  भूकंप विज्ञान केंद्र यांच्या मदतीतून हे  तंत्रज्ञान  तयार झालेला आहे.  भारताबाहेरील देशामध्ये हे  आधीच हे उपलब्ध आहे. Google ने भारतात आपली Android Earthquake Alerts System लाँच केली आहे.

 

शास्त्रज्ञ  भूकंपाची तीव्रता, भूकंप होताना त्यातून बाहेर पडणारी ऊर्जा मोजण्यासाठी  रिश्टर स्केलचा वापर करतात. रिश्टर स्केलवरील  प्रत्येक संख्या त्याच्या खालच्या संकेपेक्षता दहापट अधिक शक्तिशाली  भूकंपाची नोंद  दाखवते -2 रिश्टर स्केलचा भूकंप तुम्हाला क्वचितच लक्षात येईल, परंतु -3 रिश्टर स्केलचा भूकंप दहापट मोठा असतो आणि प्रत्येकाला सहज जाणवतो.  यामध्ये 6 किंवा त्यापेक्षा जास्त नोंदवणारा कोणताही भूकंप मोठा मानला जातो.

 

26 डिसेंबर 2004 रोजी सुमात्रा बेटावर झालेल्या भूकंपाची तीव्रता 9.0 नोंदवली गेली आणि भूकंपामुळे त्सुनामी नावाच्या समुद्राच्या लाटा निर्माण झाल्या.  प्रचंड भूकंप आणि त्सुनामीच्या लाटांमुळे  प्रचंड नुकसान आणि हानी झाली.

 

सिस्मोग्राफ हे भूकंपाचे धक्के मोजणारे साधन आहेत. शास्त्रज्ञ  हे सिस्मोग्राफ आता अजून ऍडव्हान्स पद्धतीने  त्यांचा डेटा कॉम्पुटरवर मोजण्यासाठी वापरतात आणि हजारो मैल दूर पृथ्वीवर एखादा भूकंप झाल्यास एक तो देखील मोजतात आणि त्याचा अभ्यास करून विश्लेषण केले जाते .

 

जर्मनीच्या भूवैज्ञानिक संशोधन संस्थेचे भूकंपशास्त्रज्ञ झियाओहुई युआन यांनी सुमात्रा बेटावर 28 मार्च 2005 रोजी झालेल्या भूकंपाच्या लहरींचा अभ्यास केलेला आहे. जगभरात आज शेकडो सिस्मोग्राफिक स्टेशन आहेत. यामुळे शास्त्रज्ञ भूकंपाची वेळ, परिमाण आणि स्थान (अक्षांश, रेखांश आणि खोली) शोधण्यासाठी वापरतात.

 

गुगलचा वापर आता सर्वजण करतात . कुठलीही माहिती आपल्याला हवी असेल तर गुगलवर लगेच मिळते. आता गुगलच्या सर्च इंजिन  (Google search engine )   सिस्टिम समाविष्ट करण्यात आली आहे   आणि ती म्हणजे भूकंपाची सूचना  देणारी किंवा  भूकंप होण्याआधीच सूचना देऊन सावध करणारे तंत्रज्ञान म्हणजेच “अर्थक्वेक अलर्ट सिस्टीम.”  ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आहे त्यांना हे वापरता येते.
यामुळे ज्या परिसरामध्ये भूकंप होणार याची सूचना किंवा अलर्ट मिळेल आणि यामुळे बऱ्याच प्रमाणात लोक सावध होऊ शकतील.

 

स्मार्टफोनवर हा इशारा किंवा हे अलर्ट कसे मिळेल ?

 

आपल्याला भूकंपाची माहिती आधी मिळण्यासाठी या तंत्रज्ञानामध्ये ( टेक्नॉलॉजी) मध्ये एक्सीलेमीटर या सेन्सर्स चा वापर केला गेला आहे. ह्या  एक्सीलेमीटरला  मीटर ला “पी वेव्ह” म्हणजेच भूकंपलहरी ओळखता येतात . या लहरी म्हणजे  प्राथमिक लहरी  आहेत आणि याचे मापन भूकंपाच्या वेळी केले जाते.

 

मोबाईल मधील या तंत्रज्ञानामुळे भूकंपाची सूचना मिळेल. सर्व स्मार्टफोन्समध्ये लहान प्रवेगमापक (एक्सीलेमीटर) असतात जे कंपन ,सिग्नल्स आणि वेग ओळखतात. ह्यामुळे भूकंपाची सूचना अगोदर मिळू शकते . या सेन्सर्स ना असे काही आढळले किंवा त्यांना भूकंप लहरी जाणवत असतील , तर तिथे हे धक्के जाणवत आहेत , त्या ठकाणासह  तो earthquake  detection  सर्वर ला सिग्नल पाठवतो.

 

भूकंप होत आहे की नाही हे शोधण्यासाठी सर्व्हर नंतर अनेक फोनमधील माहिती एकत्र करतो.  स्मार्टफोन्स भूकंपाचा कंपन आणि हादरण्याचा वेग ओळखतात आणि त्यानुसार प्रभावित भागात Android वापरकर्त्यांना सावध करू शकतात . त्या भागात आधीच सूचना मिळू शकते .

 

Android Earthquake Alerts System in smartphone

भारतातील सर्व Android 5 फोन असणाऱ्या सर्वांना हे वापरता येईल. हि सूचना मिळण्यासाठी  वाय-फाय आणि/किंवा सेल्युलर डेटा कनेक्टिव्हिटी,  Android भूकंप सूचना आणि स्थान ,सेटिंग्ज व्यवस्थित असणे आवश्यक आहे. ज्यांना हि सूचना नको असेल ते डिव्हाइस सेटिंग्जमध्ये भूकंप त्याप्रमाणे settings करू शकतात.
येण्याआधीच ओळखू शकेल आणि  Android फोन वापरणाऱ्यांना आधीच सूचना मिळू शकते.  Android Earthquake Alerts System ही एक विनामूल्य सेवा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page