भारतातील वनांचे प्रकार

भारतातील वनांचे प्रकार

नैसर्गिक वनस्पती :

निसर्गतः ज्या वनस्पती वाढतात त्यांनाच नैसर्गिक वनस्पती असे म्हणतात. नैसर्गिक वनस्पती मध्ये अरण्ये व गवताळ कुरणे यांचा समावेश होतो. अरण्ये हे एक खूप  महत्वाची साधनसंपत्ती आहे. नैसर्गिक वनस्पतीवर, त्यांच्या वाढीवर पाऊस हवामान ,प्राकृतिक रचना, जमिनीचे प्रकार, पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनी, मानवी हस्तक्षेप या घटकांचा परिणाम होतो.

निसर्गाने वनस्पतीची संरक्षणात्मक रचना केलेली असते. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात पानझड हिमवर्षावापासून बचाव व्हावा म्हणून शंखाकृती  फांद्या व पानाची रचना असे त्यानुसार ,हवामानानुसार वनस्पतींचे स्वरूप असते.  चंदनाच्या झाडापासून सुवासिक तेले बनवतात . तसेच कलाकुसरीच्या वस्तू बनवितात. अशाप्रकारे वनांपासून विविध प्रत्यक्ष फायदे मानवाला मिळतात.

वनसंवर्धन

दरवर्षी भारतात  सुमारे 1.5लाख हेक्टर क्षेत्रातील वृक्षतोड केली जाते. मागील 35 वर्षांच्या काळात सुमारे 47 लाख हेक्टर क्षेत्रांतील जंगले तोडण्यात आली आहेत.  याप्रमाणे वृक्षतोड सुरू राहिली तर शंभर वर्षाच्या काळात देशातील जंगलांचे रूपांतर गवताळ प्रदेशात होईल आणि दुष्काळ व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सतत सामोरे जावे लागेल . आजपर्यंत सर्वात जास्त वृक्षतोड भारतात मध्यप्रदेशात झाली आहे.डोंगराळ पर्वतीय प्रदेशात म्हणजेच  सह्याद्री, विंध्य, सातपुडा, हिमालय पर्वतरांगा, आसाम, मेघालय, अरूणाचल प्रदेश येथे स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. कुरणांच्या अतिरिक्त वापरांमुळे मृदेच्या थराची जाडी  होते किंवा ती कडक बनते. अशा जमिनीत झाडे उगवत नाहीत.

वनस्पतींचे फायदे 

नद्या, तलाव, सरोवरे गाळाने भरून येतात. नद्यांना महापूर येतात. भूजल पातळी खालावते. वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप वाढते. पर्यावरण संतुलन बिघडते.

भारतातील वनांचे प्रकार

 

1. सदाहरित वने :

ही वने वर्षभर हिरवीगार दिसतात.या वनातील वृक्षांची कोणत्याही एका ठराविक ऋतूत पाने झडत नाहीत.

A) सदाहरित वनांचे प्रदेश : वार्षिक सरासरी 250 से.मी. पेक्षा जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात सदाहरित अरण्ये आढळतात . सह्याद्री पर्वतात 1370 मीटर उंचीपर्यंत काही ठिकाणी घाटमाथ्याचा भाग, तसेच त्रिपूरा, नागालँड, आसाम, मेघालय, अंदमान व निकोबार बेटे या ठिकाणी हि वने आढळतात.

 

B) सदाहरित वनांची वैशिष्ट्ये : 

उंची 45 ते 60 मीटरपर्यंत असते. कमी उंचीचे वृक्षदेखील असतात. 2 वृक्षांच्या फांद्या एकमेकांत मिसळून जाळीदार आच्छादन निर्माण होते.3 काही वेळेस सूर्यप्रकाशदेखील खाली येऊ शकत नाही. त्यामुळे ठिकठिकाणी दलदल निर्माण होते.  4 आसाम, मेघालय, सह्याद्री पर्वत येथील वृक्षांचे आकार मोठे आहेत.येथे प्रामुख्यने सदाहरित वने  आढळतात. 5 हंगामी स्वरूपाचा असला तरी भरपूर पाऊस पडतो 6 उष्ण व दमट हवामान असते. 7 जमिनीत ह्यूमसचे प्रमाण जास्त यामुळे येथे वर्षभर हिरवीगार घनदाट  जंगले असतात.

 

C)  प्रमुख वृक्ष :

या वनांमध्ये  साल, सारडा,  रोजवूड, शिसव,  सोनचाफा, तेलसूर, गुरजन, आंबा, जांभुळ, बिबळा, बांबू, वेत, ताडवृक्ष, किंडल ऐन, आंबा, जांभुळ, बांबू, वेत, ताडवृक्ष, किंडल, नागचंपा,  फणस, कदंब,  असे विविध वृक्ष आढळतात. चंपा,गुर्जर हे महत्त्वाचे वृक्ष आसाम, मेघालय, पश्चिम बंगालमधील  आढळतात .  तेलसूर आणि रोजवूड हे सह्याद्री येथे आढळणारे महत्वाचे  वृक्ष आहेत. आयर्नवूड, एबनी विस्तृतप्रमाणात आढळतात.

सदाहरित वनांचे उपयोग :

ज्या  वृक्षाचे लाकूड कठीण व मजबूत असते त्याचा जहाजबांधणी व फर्निचरसाठी उपयोग करतात.  तून वृक्षांपासून चहाची खोकी व खेळणी केली जातात . रोजवूडचे लाकूड लाल रंगाचे असते. फर्निचर निर्मितीसाठी त्याला जास्त मागणी असते . गुर्जर झाडाच्या लाकडाचा उपयोग रेल्वे स्लिपर्स, जहाजे , होड्या , आगपेटी उद्योगात होतो कर्नाटकातील दाडेल बेलगोला, भद्रावती, नंजनगुड येथे मुख्यत्वे  बांबूचा उपयोग कागद  गिरणीमध्ये  केला जातो.

 

2. आर्द्र पानझडी वने (मान्सून वने) :

आर्द्र पानझडी वनांचे प्रदेश : वार्षिक सरासरी पर्जन्य 150 ते 200  से.मी. असलेल्या प्रदेशात  आर्द्र पानझडी वने आहेत.  हिमालयातील शिवालिक रांगेतील भाबर व तराईचा पट्टा,ओरिसा, आसाममधील कामरूप जिल्हा, छोटा नागपूरचे पठार,अंदमान बेटावर हि वने  आढळतात. सह्याद्रीतील  पूर्व उतारावरील पट्टा,महाराष्ट्रातील  चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आहेत. हा प्रदेश ‘अल्पापल्ली’ म्हणून ओळखला जातो. तसेच भंडारा जिल्ह्यामधील काही भाग ही, सातपुडा पर्वत रांगातील गाविलगड टेकड्या, उत्तर कोकणातील रांगा, येथे देखील हि वने आहेत .

आर्द्र पानझडी वनांची वैशिष्ट्ये :

1) पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याचा पुरवठा वनस्पतींना वर्षभर पुरेसा नसतो . म्हणून कोरड्या ऋतूमध्ये  म्हणजेच मार्च ते मे या काळात साधारणपणे 6 ते 8  आठवडे वनस्पतीकडून होणारे बाष्पोत्सर्जन कमी व्हावे आणि झाडाच्या बुंध्यातील पाणी टिकून रहावे म्हणून  या काळात वनस्पती आपली पाने गाळतात म्हणून या अरण्यांना पानझडी अरण्ये असे म्हणतात.

2) घनदाट वृक्ष  मध्यम प्रमाणात असतात .

3) वृक्षांची उंची 25 ते 60 मीटरपर्यंत असते.

 

आर्द्र पानझडी वनांचे उपयोग

कृषी अवजारे, इमारती बांधकाम ,रेल्वेचे स्लीपर कोच, डबे तयार करण्याकरिता,या झाडांचा उपयोग केला जातो . चंदनाचे वृक्ष सुगंधी तेलासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. चंदनाचे तेल, चंदनाचा साबण, कलाकुसरीच्या वस्तू व मूर्ती, औषधे यासाठी हे वृक्ष उपयोगी पडतात. निलगिरी पर्वत, पश्चिम घाट तसेच द्वीपकल्पीय पठारावर तसेच कर्नाटक पठारावर काही ठिकाणी चंदनाची जंगले  आहेत.

 

3. उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने :

ज्या प्रदेशात वार्षिक पाऊस 100  ते 150 से. मी. आहे त्या प्रदेशात ही वने आहेत. थरच्या वाळवंटाच्या पूर्वेला अत्यंत विस्तृत क्षेत्रात ही वने आढळतात.  पंजाब, हरियाणाचा काही प्रदेश,  उत्तर प्रदेशातील गंगा नदीचे खोरे, मध्य प्रदेशातील माळवा पठार, महाराष्ट्रातील पर्वतरांगा,विंध्य पर्वत, व अजिंठा डोंगररांगा,  ओरिसाचा अंतर्गत भाग,तामिळनाडूचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशचा मध्य भाग,  येथील वनांचा यात समावेश होतो.येथे उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने आहेत.

उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वनांची वैशिष्ट्ये :

1) पानझडी वृक्ष उंच असतात. काही ठिकाणी कमी उंचीचे वृक्ष आढळतात. 2) काही ठिकाणी गवताळ प्रदेशही असतो. 3)हि वने  सलग पट्ट्यांमध्ये आढळत नाहीत. 4) पावसाळ्यात वनस्पती हिरव्यागार दिसतात . मात्र  वनस्पतींची पाने कोरड्या ऋतूत गळून पडतात.

प्रमुख वृक्ष व उपयोग :

उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी अरण्यात जे वृक्ष आढळतात त्यांचा उपयोग टिंबर म्हणून व्यापारी उद्देशासाठी  केला जातो. परंतु अनेक ठिकाणी वृक्षतोड करून जमीन शेतीसाठी वापरली आहे .

 

4. उष्णकटिबंधीय काटेरी वने :

ज्या प्रदेशामध्ये वार्षिक पाऊसाचे प्रमाण  75 से.मी. पेक्षा कमी असते तेथे  ही वने  आढळतात. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये पाऊसाचे प्रमाण 10 ते 50 से.मी. पर्यंत आहे. यामुळे राजस्थानचा मोठा वाळवंटी प्रदेश,  उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, पंजाब,गुजरात आणि द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यभागातील कोरडा प्रदेश येथे हि वने आढळतात .

उष्णकटिबंधीय काटेरी वनांची  वैशिष्ट्ये :

1) वर्षातील सरासरी पाऊस  कमी आणि दीर्घकाळ कोरडा ऋतु असल्याने येथे निम वाळवंटी व शुष्क प्रदेशात काटेरी झुडुपे, निवडुंगाचे अनेक प्रकार आढळतात. 2) काही झाडांच्या पानावर केस असतात. तसेच वनस्पतींची पाने बारीक व मेणचट असतात. यामुळे वनस्पतीकडून होणारे बाष्पोत्सर्जन कमी प्रमाणात केले जाते. 3)  काही वृक्षांना पानांऐवजी काटेच असतात.वृक्षांच्या साली जाड असतात. ४) झाडे कमी उंचीची असतात. वृक्षांची मुळे पाण्यासाठी  खूप खोल गेलेली असतात.

प्रमुख वृक्ष

चिंच, बोर,कडुलिंब, हिवर, बाभूळ, खैर, शेर, नेपती, शमी,घायपात, कोरफड, निवडुंग तरवड, व खुरटे गवत इ. वनस्पती या अरण्यात आढळतात. उत्तर भारतात खैर आढळतो. मध्य भारतात  बोर, बाभूळ, पिंपळ, लिंब,  आढळतात. गंगेच्या खोऱ्यात  गवताळ प्रदेश आहेत  . शिवालिकच्या  पर्वताच्या रांगांमध्ये बांबूची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात.

 

उष्णकटिबंधीय काटेरी झाडांचे उपयोग

बाभूळची साल, तरवड यांचा कातडी कमविण्यासाठी किंवा टॅर्निंगसाठी उपयोग होतो. बाभूळाचे लाकूड कठीण व मजबूत असल्याने , यापासून बैलगाडी व नांगर तयार करतात . कडुलिंबाचे लाकूड इमारत बांधकामात वापरतात. कोरफड वनस्पती औषधांसाठी वापरतात तर घायपात दोरखंड बनवण्यासाठी उपयोगी ठरतो. बऱ्याच झाडांपासून इंधनासाठी लाकूड मिळते. थोडक्यात, भारतामध्ये उष्ण काटेरी वने वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.

5. आर्द्र समशीतोष्ण वने :

हिमालयामध्ये  ही वने  पाऊसाचे प्रमाण आणि उंचीनुसार पुढीलप्रमाणे 5 प्रकारची आहेत.

1 पूर्व हिमालयीन वने : हिमालयामध्ये पूर्वेकडे  1000 ते 2000 मीटर उंची दरम्यान घनदाट, सदाहरित असतात. ओक, चेस्टनट याबरोबर अँश व बीचची वने आहेत. तसेच या प्रदेशाच्या  कमी उंचीवर साल वृक्ष आढळतात.

2 पश्चिम हिमालयातील पाईन वने : प्रामुख्याने 1000 ते 2000 मी. दरम्यान चीरपाईनची जंगले आहेत. त्यांचा उपयोग इमारती व फर्निचरसाठी करतात. जास्त पावसाच्या  प्रदेशात ओकची झाडे आहेत.

3  भूमध्यसागरी हवामान वने : जम्मू-काश्मीरच्या दक्षिणेकडील पर्वतीय क्षेत्रात ,  ऑलिव्ह, अकेशिया इत्यादींची वने आहेत. येथे हिवाळ्यात देखील थोडा  पाऊस असतो .

4  हिमालयाच्या उत्तर उतारावरील वने : हा प्रदेश पर्जन्यछायेत येत असल्याने 100 से.मी. पेक्षाही कमी पाऊस येथे पडतो. या विभागात  देवदार, ज्युनिपर, ओक, अशी  सूचिपर्णी झाडे आढळतात.

 

6. शुष्क समशीतोष्ण गवताळ वने :

हिमालयातील 1000 मीटर उंचीवर पाऊसाचे  प्रमाण खूप कमी असते . त्याचप्रमाणे तापमानही ६ सेल्सियसपेक्षा कमी झाल्याने वृक्षांच्या ऐवजी खुरटे गवत सर्वत्र आढळते. या क्षेत्रात गुजर लोक पशुपालन करतात.

 

7. अल्पाईन वने :

अल्पाइन वने पूर्व हिमालयमध्ये आढळतात.  पूर्व हिमालयमध्ये 4500 मीटरवर  ज्युनिपर आढळते. तसेच  4000 मीटरवर सिल्व्हर फर, हे वृक्ष आढळते . भारतात वनांचे याप्रमाणे 7 प्रकार असून ते महत्वाचे मानले जातात.

You cannot copy content of this page