भारत देश काही महत्वाची माहिती

 

भारत देश काही महत्वाची माहिती येथे पाहू!

भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले . यानंतर भाषावार म्हणजे ,ज्या प्रांताची जशी भाषा असेल त्यानुसार मागणी केली गेली.आणि यामुळे भारतात केंद्रशासित प्रदेश आणि संघराज्याची निर्मिती केली गेली.

प्रत्येक राज्याचा कारभार पाहण्यासाठी राज्यपालांची नेमणूक केली जाते.केंद्रशासित प्रदेशांचा कारभार , हा प्रशासक किंवा उपराज्यपाल यांचेमार्फत राष्ट्रपती बघतात .ज्या शहरांची लोकसंख्या पाच लाखांपेक्षा जास्त असते त्या शहरात महानगरपालिका हे शासकीय कामकाज पाहतात

शहरांमध्ये शासकीय कामकाजांसाठी नगरपरिषद असते . संपूर्ण देशाचा कारभार राष्ट्रपती पाहतात परंतु देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी पंतप्रधानाची नेमणूक केली जाते. हे करत असताना सर्व निर्णयांची माहिती  पंतप्रधानांकडून राष्ट्रपतींना दिली जाते.

भारताची राज्यघटना !!

भारत हा लोकशाही असलेला देश आहे . भारतात १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राज्यघटना तयार करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना तयार केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली .या समितीने २ वर्षात हि राज्यघटना तयार केली.

भारताचा प्रजासत्ताक दिन माहिती (Republic day of India) 

२६ जानेवारी १९५० मध्ये राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली. म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन (Republic day of India)  म्हणून साजरा केला जातो.

२६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण आणि ध्वजसंचलन केले जाते.यामध्ये राष्ट्रदलाच्या ३ तुकड्या सहभागी असतात . तसेच हवाई दलाचे प्रात्यक्षिक देखील पाहायला मिळते . प्रत्येक राज्याचे सुशोभित रथ यात पाहायला मिळतात .

देशाची राष्ट्रीय अस्मिता दर्शवण्यासाठी ह्याचे आयोजन दिल्ली येथे केले जाते .

भारताचा राष्ट्रध्वज किंवा झेंडा हे आपल्या स्वतंत्र देशाचे प्रतीक आहे .  भारताच्या ध्वजावर केशरी ,पांढरा आणि हिरवा अश्या रंगांचे पट्टे आहेत. आणि मध्ये अशोक चक्राचे चिन्ह आहे . १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतातील लाला किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला .

राष्ट्रध्वज हे देशाच्या ऐक्याचे , सार्वभौमत्वाचे आणि राष्ट्रीयत्वाचे प्रतीक आहे. या राष्ट्रध्वजाच्या वापरण्याचे काही नियम आहेत. राष्ट्रध्वज हा सूर्योदयाच्या वेळी फडकवण्यात येतो आणि सूर्यास्ताला उतरवतात. सरकारी कार्यालयांवर हा राष्ट्रध्वज कायमच उभारलेला असतो. पण ठराविक दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट (Independence day)  , प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) दिवशी ध्वजारोहण केले जाते .

भारतातील विद्वान व्यक्तींचे निधन झाल्यास , राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून दुःख व्यक्त केले जाते.

भारताचे राष्ट्रीय प्रतीक !

भारतातील  सारनाथ येथील अधिक स्तंभाचा, सिंहांचे चिन्ह असणारा भाग राष्ट्रीय प्रतीक आहे. यावर ” सत्यमेव जयते ” हे घोषवाक्य आहे. सर्व सरकारी कामकाजाच्या कागदपत्रांवर हे चिन्ह असते. तसेच चलनी नोटा आणि नाणी यावर देखील हे चिन्ह छापलेले असते.

भारताचे राष्ट्रगीत ” जन गाणं मन हे आहे .हे राष्ट्रगीत महान कवी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे .

भारतचे राष्ट्रीय फुल  – सुंदर असे कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे.

भारताचा राष्ट्रीय पक्षी – भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.

भारताचा राष्ट्रीय प्राणी –     भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे . भारतात अनेक ठिकाणी वाघ संवर्धन प्रकल्प /अभयारण्ये आहेत.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page