गुजरात राज्याची महत्वाची वैशिष्ट्ये

या लेखात भारतातील गुजरात या राज्याची थोडक्यात माहिती पाहू .
गुजरात या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला महाराष्ट्र, पूर्वेला मध्य प्रदेश, उत्तर-पूर्वेला राजस्थान आहे. तर उत्तर-पश्चिमेला पाकिस्तान या देशाची सीमारेषा आहे , म्हणजेच या राज्याची आंतरराष्ट्रीय सीमा पाकिस्तानशी जोडली आहे.

गुजरात राज्यात तीन प्रमुख भौगोलिक प्रदेश आहेत

1 मुख्य भूप्रदेश, 2 सौराष्ट्राचा द्वीपकल्पीय प्रदेश आणि 3 कच्छ प्रदेश, कच्छचा रण म्हणून ओळखला जाणारा वाळवंटी प्रदेश.
गिरनार पर्वत हा या राज्यातील सर्वात उंच पर्वत आहे. याची उंची 1,145 मीटर आणि लांबी सुमारे 160 किमी. आहे.

कच्छचे रण / कच्छचे वाळवंट

गुजरातमधील सर्वात मोठा जिल्हा कच्छ आहे. या प्रदेशाचे क्षेत्रफळ 45,674 किमी² आहे.
कालो डुंगराची (ब्लॅक हिल) हे भारतातील गुजरातमधील कच्छमधील सर्वात उंच शिखर आहे . याची उंची 462 मी. आहे.

हे वाळवंट त्याच्या पांढऱ्या खारट वाळवंटाच्या वाळूसाठी प्रसिद्ध आहे आणि गुजरातमध्ये असलेले जगातील सर्वात मोठे मीठाचे वाळवंट कच्छचे वाळवंट म्हणून ओळखले जाते. कच्छ रणमध्ये एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला थरचे वाळवंट आहे.

पश्चिम गुजरातमधील कच्छचे रण म्हणजे कच्छ जिल्ह्यातील खारट पाणथळ जमीन आहे. ह्या सर्व प्रदेशाचे क्षेत्रफळ यात सुमारे 30,000 चौरस किमी आहे, ह्या प्रदेशात कच्छचे ग्रेट रण, कच्छचे छोटे रण आणि बन्नी गवताळ प्रदेश समाविष्ट आहे. हा भाग भारतातील गुजरात आणि पाकिस्तानमधील सिंध प्रदेशाच्या दरम्यान आहे आहे.

‘रण’ याचा अर्थ वाळवंट, रण हा शब्द , संस्कृत शब्द ‘इरिना’ पासून आला आहे, इरिना म्हणजे वाळवंट . कच्छच्या रहिवाशांना कच्छी म्हणतात.
या प्रदेशात हे फ्लेमिंगो आणि वन्य गाढव यासारखे प्राणी आढळतात .

दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात गुजरात सरकार तर्फे तीन महिन्यांचा उत्सव ‘रण उत्सव’ म्हणून साजरा करतात. यात येथील पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आणि कच्छ प्रदेशाच्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून हा उत्सव साजरा करता

 सौराष्ट्राचा द्वीपकल्पीय प्रदेश

सौराष्ट्र हा गुजरातमधील एक द्वीपकल्पीय प्रदेश आहे, हा प्रदेश पूर्वी काठियावाड म्हणून ओळखला जात असे.
खंबातची खाडी (पूर्वी कॅम्बेची खाडी म्हणून ओळखली जाणारी) ही भारताच्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर आहे.
कच्छच्या आग्नेयेला, कच्छच्या उपसागर आणि खंभातच्या (कॅम्बे) उपसागराच्या दरम्यान , मोठा पठाराचा भाग म्हजेच ज्याला काठियावाड द्वीपकल्प किंवा पठार म्हणतात . हा प्रदेश कोरडा आहे.
या भागात गिरनार टेकड्या आहेत. .या पठारी प्रदेशातील माती मध्ये माती बहुतेक नापीक आहे.आणि हि मृदा या भागातील जुन्या स्फटिकासारखे खडक किंवा स्फटिक खडकांपासून तयार झालेली आहे .

गुजरात चा पूर्व भाग एक सुपीक मैदान आहे. ह्या प्रदेशाची निर्मिती तापी, नर्मदा, साबरमती आणि माही नदीने आणलेल्या गाळामुळे झाली आहे. नर्मदा नदी ही गुजरात राज्यातील सर्वात लांब नदी आहे आणि हि पश्चिमवाहिनी नदी आहे.
मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतरांगांमधून नर्मदा नदी उगम पावते. कावेरी, कोलार आणि कुंडी हे सर्व नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत.
नर्मदा नदीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची उपनदी म्हणजे तवा नदी. तर माही नदी पश्चिमेकडून वाहणारी नदी आहे. तो खंबातच्या आखातातून अरबी समुद्राला मिळते .

सरदार सरोवर धरण

सरदार सरोवर धरण नर्मदा नदीवर बांधण्यात आले आहे . ते गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया जवळ नवागाम येथे आहे. सरदार सरोवर धरण हे जगातील दुसरे सर्वात मोठे सिमेंटचे (काँक्रीट) धरण आहे. हे धरण
गुजरातमधील तापी नदीवर बांधलेले आहे आणि ते भारतातील सर्वात मोठे धरण आहे. याला वल्लभ सागर असेही म्हणतात. या धरणाची उंची 105 मीटर आहे.

गुजरातच्या उत्तरेकडील किनारी भागात वालुकामय चिकणमाती आढळते.
चिकणमाती प्रकारची माती सौराष्ट्रात देखील आढळते. आशियातील सर्वात मोठे आणि उत्कृष्ट गवताळ प्रदेश म्हणजे गुजरातमधील बन्नी गवताळ प्रदेश आहे.

गुजरातमधील तापमान साधारणपणे हिवाळ्यात हिवाळी म्हणजेच नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान मध्यात सुमारे 28 डिग्री सेल्सिअस असते. उन्हाळ्यात म्हणजेच मार्च ते मे तापमान उष्ण असते

गीर राष्ट्रीय उद्यान

गुजरातमध्ये प्रसिद्ध गीर राष्ट्रीय उद्यान आहे .
गीर राष्ट्रीय उद्यान, भारताच्या गुजरात राज्यातील जुनागढ जिल्ह्याच्या दक्षिणेस ६५ किलोमीटर अंतरावर आहे. गुजरातमध्ये भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
गीर राष्ट्रीय उद्यानात आशियाई सिंह जास्त संख्येने आढळतात . हे उद्यान आशियायी सिहांस्थलांतरित पक्ष्यांच्या सुमारे 300 प्रजातींची नोंद येथे करण्यात आली आहे.
कांकरिया तलाव हे अहमदाबादमधील दुसरे सर्वात मोठे तलाव आहे. हे शहराच्या दक्षिण-पूर्व भागात स्थित आहे.
नल सरोवर पक्षी अभयारण्य हे 200 हून अधिक स्थानिक आणि स्थलांतरित प्रजातींचे घर आहे. ब्राह्मणी, जांभळा मूरहेन बगळे आणि पाणपक्षी यासारख्या दुर्मिळ प्रजाती आहेत.

इतर माहिती

गुजरातमधील प्रसिद्ध राजकोट शहर आजी आणि निरारी नदीच्या काठावर वसलेले आहे.

साबरमती आश्रम (गांधी आश्रम) हे अहमदाबादच्या साबरमती उपनगरात स्थित आहे.
सी बी पटेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम सुरत, गुजरात येथे बांधले आहे.

26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमध्ये भूज भूकंप झाला.
2001 मध्ये भूज भूकंपाची तीव्रता 7.7 होती, ज्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम झाले.
गुजरात राज्यात 33 जिल्हे आहेत.

गुजरात, केवडिया, येथे असलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी, हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, ज्याची उंची 182 मीटर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page