कर्नाटकातील धबधबे !!

 

कर्नाटकमधील  जोग फॉल्स , शिवसमुद्रम धबधबा , तसेच हेब्बे फॉल्स हे  प्रमुख धबधबे आहेत. यातील शिवसमुद्रम धबधबा म्हणजे एक सुंदर ठिकाण आहे तर सर्वात उंच जिग फॉल्स हा देखील प्रेक्षणीय आहे. भारतातील कर्नाटक राज्य भौगोलिक दृष्ट्या समृद्ध आहे. कर्नाटक राज्यातून कृष्णा , कावेरी , गोदावरी, पेन्नार या प्रमुख नद्या वाहतात.  कर्नाटक राज्यात नद्यांमुळे सर्वात उंच धबधबे निर्माण झाले आहेत .

शिवसमुद्रम धबधबा – एक सुंदर ठिकाण !!

 • भारतातील कावेरी ही महत्त्वाची नदी आहे. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधून वाहते.  कावेरी नदीचा उगम  पश्चिम घाटामध्ये होतो. कर्नाटक राज्यामधील  कोडागु जिल्ह्यामधील ब्रह्मगिरी पर्वतरांगे मधील तलकावेरी येथे  समुद्रसपाटीपासून तेराशे 41 मीटर उंचीवर ही नदी उगम पावते.
 • कर्नाटक मध्ये कावेरी नदी  दोन बेटांमुळे विभागली जाते. ती  दोन बेटे म्हणजे  शिवसमुद्रम आणि श्रीरंगपट्टम!!  आणि म्हणूनच कावेरी नदीपासून  तयार झालेला शिवसमुद्रम धबधबा शिवसमुद्रम बेटावर पाहायला मिळतो.
 • शिवसमुद्रम फॉल्स म्हणजेच शिवसमुद्रम धबधबा भारतामध्ये कर्नाटकामध्ये आहे. प्रामुख्याने हा धबधबा कर्नाटक मध्ये मलावल्ली तालुक्यात आहे या धबधब्याची उंची 90 मीटर म्हणजेच 300 फूट आहे.
 • शिवसमुद्रम फॉल्स हा कावेरी नदीच्या काठावर भारतातील  कर्नाटक राज्यात आहे. या ठिकाणी जे छोटे मोठे धबधबे आहेत. ते मिळून हा वॉटरफॉल तयार होतो ते मिळून हा वॉटरफॉल तयार होतो
 • शिवसमुद्रम हे छोटे बेट आहे . त्याची लांबी तीन मैल आहे आणि रुंदी दीड मैल आहे. या ठिकाणी डोंगराच्या आकारामुळे एक मोठा तलाव दिसतो.  या तलावापासून थोडेसे पुढे गेल्यावर  380 फूट उंचीवरून कावेरी नदीचे पाणी या धबधब्याच्या स्वरूपात कोसळते. शिवसमुद्रम हे एक प्राचीन ठिकाण आहे.
 • बाराचुक्की आणि गगनचुक्की फॉल्स किंवा हे दोन धबधबे सुद्धा प्रसिद्ध आहेत. कावेरी नदीचा प्रवाह दक्षिणेला थोड्या किलोमीटरच्या अंतरावर पश्चिम आणि पूर्व असा विभागला गेल्याने हे दोन धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. शिवसमुद्र येथे असलेल्या वॉच टॉवर मधून खूप छान प्रकारे पाहता येतो.
 • दख्खनच्या पठारावरून वाहते. या पठारावर खडक आणि खड्डे आहेत. म्हणजेच पठाराची रचना अश्या प्रकारची असल्याने, कावेरी नदी वाहताना या खडक आणि खड्ड्यांमुळेच धबधबा तयार होतो. शिवसमुद्रम या बेटावर जे शहर आहे त्यामुळे कावेरी नदीचे दोन प्रवाह निर्माण झालेले आहेत म्हणूनच या नदीच्या प्रवाहांमधील हे  चौथ्या नंबरचे सर्वात मोठे बेट आहे.
 • शिवसमुद्रम येथील हा धबधबा फार मोठ्या उंचीवरून कोसळतो. या धबधब्याची उंची 98 मीटर म्हणजेच 322 फूट आहे आणि प्रति सेकंद 934 घनमीटर म्हणजेच तेहतीस हजार घनफूट प्रतिसेकंद किंवा दर सेकंदाला पाणी उंची वरून पडते किंवा वाहत असते.
 • येथे या धबधब्याजवळच श्री रंगनाथ स्वामी मंदिर आहे या मंदिराला भेट देण्यासाठी भाविक येत असतात. परंतु इथे येण्यासाठी बराच प्रवास करावा लागतो किंवा थोडा दुर्गम भाग असल्यामुळे येथे येणाऱ्यांची संख्या कमी आहे. हे मंदिर द्रविडशैलीमध्ये म्हणजेच बांधले आहे म्हणजेच याची रचना शैलीच्या पद्धतीचे आहे.

 

सर्वात उंच धबधबा “जोग फॉल्स”

 

 • भारतात कर्नाटक राज्यात शिमोगा येथे जोग फॉल्स हा सुंदर धबधबा आहे . आणि हा अतिशय प्रसिद्ध धबधबा आहे . उंच डोंगरावरून हा धबधबा खाली कोसळतो आणि  हा कर्नाटकातील सर्वात उंच धबधबा असून , भारतातील दुसऱ्या नंबरचा सर्वात उंच धबधबा आहे.  या धबधब्याची उंची आहे.  चार छोट्या धबधब्यांचा मिळून हा एक धबधबा बनला आहे .

 

 • जोग फॉल्स शरावती नदीवर आहे. भारताच्या कर्नाटक राज्यातून शरावती नदी वाहते. हि पश्चिमवाहिनी नदी आहे . हि नदी प्रामुख्याने पश्चिम घाटातून वाहते . म्हणूनच  या नदीमुळे प्रसिद्ध जोग धबधबा तयार झाला आहे. छोटे छोटे धबधबे मिळून जोग धबधबा तयार झालाय. याची उंची 253 मीटर आहे . 253  मीटर उंचीवरून हा कोसळतो .
 • पहिला धबधब्याचा प्रवाह 829 फूट उंचीवरून वाहतो / कोसळतो . येथे तलाव आहे आणि तो १३२ फूट खोल आहे . दुसरा जो धबधबा आहे तो फेसाळलेल्या पाण्याचा  प्रवाह आहे  . तिसरा प्रवाह  थोडा दक्षिणेकडे आहे. त्यातून फेसाळलेल्या  पाण्याचा प्रवाह  बाहेर पडतो.

हेब्बे धबधबा ( हेब्बे वॉटरफॉल्स)

 • हा देखील कर्नाटक मध्ये चिकमंगळूर येथे आहे. हा धबधबा भद्रा नदीवर आहे.
  भारतातील कर्नाटकातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण केमनगुंडी हे प्रसिद्ध आहे . या केम्मनगुंडीपासून सुमारे 10 किमी अंतरावर येथे आहे. हेब्बे धबधबा हा सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. ह्याची उंची ५५१ फूट आहे .  म्हणजे हा धबधबा ५५१ उंचीवरून कोसळतो. याचे दोन प्रवाह किंवा प्रपात आहेत. याच्या चारही बाजूला कॉफीचे मळे आहेत. कारण या धबधब्यांमुळेच कॉफीच्या लागवडीसाठी अनुकूल वातावरण येथे आहे .

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page